Bhosari : दुकानांवर दोन दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा, मनसेचा इशारा

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरातील सर्व दुकानदारांनी आपल्या (Bhosari) दुकानांवर दोन दिवसात मराठी पाट्या लावाव्यात. अन्यथा दुकानांच्या पाट्या फोडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

भोसरी परिसरात अनेक दुकानात जाऊन मनसेकडून पत्राद्वारे निवेदन आणि जाहीर आवाहन करण्यात आले आहे. आळंदी रोड , दिघी रोड , लांडेवाडी , चक्रपाणी , गव्हाणेवस्ती आणि भोसरी गावठाण या भागाताली सर्व दुकान मालकांना पत्र देण्यात आले. दुकानावर दोन दिवसात मराठी पाठी लावावी.

Breaking News: तळवडे ज्योतिबानगर येथे कारखान्याला भीषण आग, सहा महिला कामगारांचा मृत्यू

दोन दिवसात जर पाटी नाही लावली. पाटीत काही बदल केला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते दुकानांची पाटी फोडतील. याची जबाबदारी फक्त दुकान मालकांची असेल, अशा इशारा दिला आहे.

यावेळी उपविभाग अध्यक्ष अंकित शिंदे, शाखाध्यक्ष मांतू राठोड, (Bhosari) उपशाखाध्यक्ष करण गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.