Pimpri : पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलातील शहीद जवान विशाल जाधव यांच्या कुटुंबियांना सवलती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलातील जवान विशाल हनुमंतराव जाधव (Pimpri )यांना 1 डिसेंबर 2019 रोजी दापोडी येथील एका बचाव कार्यादरम्यान वीरमरण आले. अग्निशमन विभागाने त्यांना शहीद दर्जा आणि त्याबाबत असणाऱ्या सवलती मिळण्याबाबत पाठपुरावा केला. 1 जुलै 2021 रोजी शासनाने विशाल जाधव यांना शहीद दर्जा आणि त्यांच्या कुटुंबियांना सवलती देण्याची घोषणा केली. त्या सवलती अग्निशमन विभागाकडून दिल्या जात आहेत.

विशाल जाधव हे 24 डिसेंबर 2012 रोजी अग्निशमन दलात रुजू झाले. 1 डिसेंबर 2019 रोजी (Pimpri )दापोडी येथे 25 फूट खोल खड्ड्यात एक व्यक्ती अडकली होती. त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे बचाव कार्य सुरु होते. विशाल जाधव हे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी खोल खड्ड्यात उतरले होते. दरम्यान वरून मातीचा मोठा ढिगारा ढासळला आणि त्याखाली अडकून कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आले.

Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

अग्निशमन विभागाकडून प्रथम महापालिका स्थायी समिती व महापालिका सभा यांची मान्यता घेऊन विशाल जाधव यांना शहीद दर्जा व शहिदांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या सवलती मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. तो प्रस्ताव मंजूर करत 1 जुलै 2021 रोजी शासनाने विशाल हनुमंतराव जाधव यांना शहीद दर्जा दिला. तसेच त्यांच्या कुटुंबियांना सवलती जाहीर केल्या.

त्यामध्ये पिंपरी वाघेरे येथे म्हाडा इमारतीमध्ये 600 चौरस फूट सदनिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहीद विशाल जाधव यांच्या दोन अपत्यांच्या माध्यमिक शिक्षणाचा खर्च अग्निशमन विभागाकडून करण्यात येत आहे. शहीद विशाल जाधव यांच्या पत्नी प्रियंका जाधव यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे.

 

25 लाख रुपयांचे दहा वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट करून त्यावरील व्याज शहीद विशाल जाधव यांच्या वारसांना अग्निशमन विभागाकडून देण्यात येत आहे. शहीद विशाल जाधव हे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत कार्यरत आहेत असे समजून त्यांना मासिक वेतन अदा करण्यात येत आहे. ज्यामध्ये 30 टक्के वेतन शहीद विशाल जाधव यांचे आई वडिल आणि 70 टक्के वेतन त्यांच्या पत्नीस दिले जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.