Nagpur Pune Special Train : नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वे द्वारे नागपूर-पुणे-नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाड्यांची(Nagpur Pune Special Train )वारंवारता आठवड्यातून दोन दिवसांवरून तीन दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या हंगामात होणारी प्रवाशांची गर्दी आणि प्रतिसाद लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पुणे ते नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी क्र. 01166 दिनांक 19.4.2024 ते 14.6.2024 पर्यंत (Nagpur Pune Special Train )मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असे आठवड्यातून तीन दिवस धावेल.

Fire Service Week : आगीच्या घटना टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी…
नागपूर ते पुणे सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी (क्रमांक 01165) 18 एप्रिल 2024 ते 13 जून 2024 पर्यंत सोमवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस धावेल.

ही गाडी उरुळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबेल. या गाडीसाठीचे आरक्षण 13 एप्रिल पासून www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.