Pune : निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोथरुड येथे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदार संघांतर्गत कोथरुड विधानसभा मतदार संघात (Pune)निवडणुकीसाठी नियुक्त 1 हजार 30 अधिकारी- कर्मचाऱ्यांना यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार अंजली कुलकर्णी, (Pune)नायब तहसीलदार स्वप्नील खोल्लम उपस्थित होते.

Pimpri : पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलातील शहीद जवान विशाल जाधव यांच्या कुटुंबियांना सवलती

प्रशिक्षणादरम्यान सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गलांडे यांनी मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली. मतदान केंद्राध्यक्षांनी मतदानाच्या दिवशी करावयाचे मशीन सिलिंग, करावयाचे घोषणापत्र व घ्यावयाची काळजी आदीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी व्हीव्हीपॅट व ईव्हीएमबाबत माहिती देऊन हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

यावेळी क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहायक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.