Velha Bull News : दरीत पडलेल्या बैलाला वाचविण्यासाठी शेतकऱ्याचे 25 दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न

एमपीसी न्यूज – शेतकऱ्याचं आणि बैलाचं नातं काय असतं हे वेगळं सांगायला नको. शेतात राबणारा बैल हा शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असतो. या बैलाला काही दुखलं कुठलं तर शेतकरी कासावीस होतो. असाच काहीसा प्रकार वेल्हे तालुक्यातील (Velha Bull News) दुर्गम भागात असणाऱ्या रांजणे गावात घडला आहे.

डोंगरावर चढण्यासाठी गेलेला सर्जा नावाचा बैल (Velha Bull News) खोल दरीत कोसळला. गेल्या 25 दिवसांपासून शेतकरी विजय शेंडकर या बैलाला वर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अजून त्यांना यामध्ये यश आले नाही. बैलाच्या काळजीपोटी दलित दूर लावून जमेल तितका चारा पाणी आणि औषध आपल्या सर्जा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विजय शेडकर करत आहेत.

Sharad Pawar : “तुम्हाला कोणी सांगितले की, मी म्हातारा झालो म्हणून”, शरद पवारांनी घेतली शेतकऱ्याची फिरकी

वेल्हे तालुक्यातील रांजणे गावात राहणारे शेतकरी विजय शेंडकर यांचा हा सर्जा नावाचा बैल (Velha Bull News) रानात चालत असताना खोलदरीत पडला. या खोल दरीतून त्याला पाय वाटेने काढणे शक्य नाही. 25 दिवसांपासून विजय शेडकर दोरीच्या सहाय्याने खोल दरीत उतरून बैलाला चारा पाणी आणि औषध देत आहेत. मात्र 25 दिवसांपासून खोल दरीत अडकल्यामुळे बैलाला आता अशक्तपणा आला आहे. बैलाला बाहेर काढण्याचे सर्व ते उपाय केल्यानंतर आता हे शेतकरी कुटुंबीय हताश झाले आहेत.

Today’s Horoscope 25 Oct 2022 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य

 

त्यानंतर त्यांनी शासनाकडे मदतीची याचना केली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते माऊली दारवटकर यांच्याशी संपर्क करून त्यांनी मदतीची मागणी केली.

दारवटकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला आणि या संपूर्ण घटनेची माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनीही तातडीने जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि संबंधित शेतकऱ्याला मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने सूचना केल्याची माहिती दारवटकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.