Pune: पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांना कल्याण- डोंबिवली प्रमाणे करात सवलत द्या- सुप्रिया सुळे

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांना(Pune)  कल्याण- डोंबिवली प्रमाणे करात सवलत आणि पिंपरी चिंचवड प्रमाणे शास्ती कर माफी द्या, अशी मागणी  खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. 
समाविष्ट 34गावांमधील जाचक कराविरुद्ध मंगळवारी (दि.१२ मार्च) सर्वपक्षीय ढोल मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी सुळे बोलत होत्या.
मुख्यमंत्र्यांनी कल्याण- डोंबिवली महापालिकेतील 27 समाविष्ट गावांसाठी ग्रामपंचायती प्रमाणे कर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेतील समाविष्ट गावांसाठी शास्ती कर माफ (Pune)केला. परंतु पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांसाठी शास्ती कराला फक्त स्थगिती दिली आहे. मग आमच्यावर अन्याय का, 34गावांवर एवढा राग रोष का आहे, या ग्रामस्थांची काय चूक आहे, असा सवालही उपस्थित केला.

 

शिवणे, उत्तमनगर, कोंढवे- धावडे, कोपरे नागरी कृती समितीचे सुरेश गुजर, अतुल दांगट, शेखर मोरे, अरुण दांगट, राहुल पायगुडे, महेंद्र दांगट, राहुल दांगट, संजय धावडे, विकास दांगट, अतुल धावडे यांनी आंदोलन आयोजित केले होते.

 

यावेळी शेखर दांगट, श्रीरंग चव्हाण, शुक्राचार्य वांजळे, त्रिंबक मोकाशी, सचिन दोडके, सायली वांजळे, अनिता इंगळे, नवनाथ पारगे, सौरभ मोकाशी, युवराज मोरे, विजय गायकवाड, रोहिदास धावडे, माणिक मोकाशी, पोपट खेडेकर, संजय धीवर, आपचे नीलेश वांजळे, सुरेखा भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
अहिरेगेट येथून शिवणे येथील पालिकेच्या कर संकलन कार्यालयासमोर पायी मोर्चा काढला. यावेळी विविध प्रकारचे ढोल- ताश्याच्या गजर करीत निर्दशने केली. मिळकत कर आकारणी प्रक्रियेतील त्रुटी दुर करण्याची मुख्य मागणी आहे. कर सवलतीचे घोषणा फलक नागरिकांच्या हाती होते. ‘अन्यायकारक रित्या कर वसुली करणाऱ्या, महापालिकेचा निषेध’, राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. शिवणे महापालिकेच्या कर संकलन कार्यालयास कुलपाची प्रतिकृतीने टाळा ठोको‌ प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

 

गावे पालिकेत 2017 पासून गेली. त्यापासून राज्य सरकारकडे योग्य कर आकारणीची मागणी केली. ग्रामपंचायतीचा २०१७ मधील कर आणि पालिकेचा २०२४ चा कर १० पटीने वाढला आहे. ग्रामपंचायतच्या अंतिम वर्षाच्या कराच्या रकमेच्या दुपटीपेक्षा जास्त नसावा, अशी मुख्य मागणी आहे. आम्ही कर भरण्यास तयार आहोत. आम्हाला सन्मानाने योग्य कर आकारणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.