Bhosari : बनावट हार्पिक, लाईजॉल, कॉलीन, रिन आला, गुड नाईट लिक्वीड विक्री प्रकरणी तिघांना अटक

15 लाख 15 हजारांचा साठा जप्त

एमपीसी न्यूज – बनावट हार्पिक, लाईजॉल, कॉलीन, रिन आला, गुड नाईट लिक्वीड तयार करून त्याची विक्री करणाऱ्या ( Bhosari) तिघांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 15 लाख 15 हजार 678 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भावेश लक्ष्मण पटेल (वय 58, रा. तोरनिया, ता. बच्चाऊ, जि. कच्छ, गुजरात. सध्या रा.  इंद्रायणीनगर भोसरी), अन्वर भचुमाई खलिफा (वय 30, रा. लाकडीया, ता. बच्चाऊ, जि. कच्छ, गुजरात. सध्या रा. इंद्रायणीनगर भोसरी), मंजी हरि भासडीया (वय 41, रा. कामोठा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अशरफुददीन फयाजुददीन इनामदार (वय 40, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : लाभार्थ्यांना सवलतीच्या कर्ज वाटप कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इनामदार यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात त्यांच्या कंपनीच्या उत्पादनांशी साधर्म्य असलेली उत्पादने मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला भावेश आणि अन्वर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख 22 हजार 456 रुपये किमतीचे रेकिट बेंकीझर या कंपनीचे हार्पिक, लाईजॉल, कॉलीन व गुड नाईट या मुळ कंपनीच्या मालाशी साध्यर्म्य असलेला माल हस्तगत करण्यात आला.
दोन्ही आरोपींचा तिसरा साथीदार मंजी भासडीया याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावट हार्पिक व इतर कंपन्याचा 12 लाख 93 हजार 222 रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल त्याने तयार केल्याचे निष्पन्न झाले ( Bhosari) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.