Pune : लाभार्थ्यांना सवलतीच्या कर्ज वाटप कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन 

एमपीसी न्यूज – लाभार्थ्यांना सवलतीच्या कर्ज वाटप कार्यक्रमाचे ( Pune ) जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती व वित्त विकास महामंडळ आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे तसेच राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सवलतीच्या कर्ज वाटप कार्यक्रमाचे 13 मार्च रोजी दु. 2 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

 

Chakan : दारूभट्टीवर छापा मारून तीन हजार लिटर कच्चे रसायन नष्ट

या कार्यक्रमाअंतर्गत देशातील एक लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच नगरपालिकेतील विविध लाभार्थ्यांना पीपीई संच आणि आयुषमान कार्डचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.