Chakan : दारूभट्टीवर छापा मारून तीन हजार लिटर कच्चे रसायन नष्ट

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू (Chakan ) असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 3000 लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) दुपारी करण्यात आली आहे.

राहुल राजपूत (रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेले आरोपीचे नाव आहे याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल सूर्यवंशी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : आळंदीमध्ये श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव उत्साहात साजरा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना शेल पिंपळगाव येथे अवैधरीत्या दारूभट्टी लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये 60 हजार रुपये किमतीचे 3000 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास  (Chakan ) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.