Alandi : आळंदीमध्ये श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – आज 12 मार्च रोजी  आळंदी येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव ( Alandi )   उत्साहात साजरा होत आहे. त्या निमित्ताने ग्रामदेवतेच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच भैरवनाथ चौकात भव्य मंडप व कमान उभारण्यात आली आहे.आज श्री भैरवनाथ उत्सवा निमित्त  यज्ञ सोहळा, श्रींचा अभिषेक ,हरी भजन इ. धार्मिक कार्यक्रम पार पडले.

Pune: पुण्यात किरकोळ कारणावरून बांधकाम मजुराचा खून

 श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त आळंदीतील नागरिकांनी श्री भैरवनाथ महाराजांना  श्रीफळ वाढवले. तसेच श्री भैरवनाथ महाराजांसह ग्राम देवतांना आळंदीकर नागरिकांनी नैवेद्य दाखवले.आज रात्री 9 वा. श्री भैरवनाथ महाराजांचा छबिना मिरवणूक काढण्यात येणार ( Alandi ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.