Pune: पुण्यात किरकोळ कारणावरून बांधकाम मजुराचा खून

एमपीसी न्यूज -पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात किरकोळ कारणावरून वाद (Pune)झाल्यानंतर एका बांधकाम मजुराचा डोक्यात वीट घालून खून करण्यात आला. मंगळवारी ही घटना घडली. पिंटू गौतमदास (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून करून पसार झालेल्या एका आरोपीला मुंबई परिसरातून ताब्यात घेतले आहे.

 

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंटूचा भाऊ छोटू याने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक भागात सर्वे नंबर 37 अजिंक्यतारा इंडस्ट्रियल इस्टेट येथे एका बांधकाम साईटचे काम सुरू आहे. त्याठिकाणी दोघेही
काम करत होते. दरम्यान त्यांना दारूचे व्यसन आहे.

 

Alandi : आळंदी नगरपरिषदेची दिव्यांगांना मदत

 

रविवारी या दोघांत वाद झाले होते. पिंटूने आरोपीला शिवीगाळ केली होती. त्याचा राग त्याच्या मनात होता. दरम्यान सोमवारी रात्री पाचव्या मजल्यावर दोघात वाद झाल्यानंतर आरोपीने पिंटूच्या डोक्यात वीट घालून त्याचा खून केला. खुनानंतर आरोपी पसार झाला.

 

रविवारी सकाळी काम सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पाहणी केली. तपास सुरू केल्यानंतर आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळताच पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.