Alandi : आळंदी नगरपरिषदेची दिव्यांगांना मदत

एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषदे मार्फत शहरातील 130 पात्र दिव्यांग (Alandi) लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 4000 प्रमाणे एकूण पाच लाख वीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी  कैलास केंद्रे यांनी दिली.

 केंद्र शासनाच्या नि:समर्थ ( दिव्यांग) व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील  कलम 37 (ब) मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी किमान 5% निधी राखीव ठेवण्यात येतो.  या निधीतून शहरातील पात्र दिव्यंगांना कृत्रिम अवयव देणे , आर्थिक सहाय्य करणे अश्या विविध प्रकारे मदत करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातात.

Pimpri : पिंपरीगाव ग्रामस्थांची संजोग वाघेरे यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका

दीव्यांगांना औषधोपचार किंवा त्यांच्या इतर दैनंदिन गरजा भागविणे शक्य व्हावे म्हणून आळंदी नगरपरिषद मार्फत 130 दीव्यांगांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 4000 रुपये थेट पाठविण्यात आले.

नगरपरिषद कार्यालय येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रतिकात्मक स्वरूपात चेकचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांच्या बँक खात्यावर निधी वितरण करण्यात मुख्याधिकारी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या वैशाली पाटील,अरुण घोडे या अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न (Alandi) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.