Haryana : नायब सिंह सैनी बनले हरियाणाचे नवे मुख्यमंत्री; हरियाणा राजभवनात घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

एमपीसी न्यूज – हरियाणामध्ये   मनोहरलाल खट्टर यांनी ( Haryana ) त्यांच्या मंत्रिमंडळासह दिलेल्या राजीनाम्याच्या  राजकीय भूकंपानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष नायब सिंह सैनी यांनी आज संध्याकाळी हरियाणाच्या राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत कंवर पाल गुर्जर यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.  शपथ घेण्यापूर्वी नायब सिंह सैनी यांनी मनोहर लाल खट्टर यांचे आशिर्वाद देखील घेतले.

 

नायब सिंह सैनी यांचा जन्म अम्बालामधील गाव मीजापूर माजरा येथे 25जानेवारी 1970 साली झाला. ते अंबाला जिल्ह्यातील नारायणगड विधानसभेतील मिर्झापूरचे रहिवासी आहेत.  त्यांनी मेरठ चौधरी चरण सिंह विद्यापीठातून एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे. ते शेतकरी कुटुंबात वाढले आहेत.

 

Alandi : आळंदी नगरपरिषदेची दिव्यांगांना मदत

 

नायब सिंह सैनी  हे हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून आणि कुरुक्षेत्र लोकसभा येथून भाजपचे खासदार देखील आहेत. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी भाजप राज्य प्रमुख म्हणून  नियुक्त केले होते. ते आरएसएसशी देखील जोडले गेलेले आहेत. 1996 मध्ये नायब सिंह सैनी यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरूवात भाजपपासून केली होती.

 

त्यांनी वेगवेगळी पदे भूषवली.  2002 मध्ये ते अंबालामध्ये युवा विंगचे जिल्हा महासचिव राहिले. त्यानंतर 2005 मध्ये ते अंबाला मध्ये जिल्हा अध्यक्ष झाले. पक्षाचे त्यांचे काम पाहून 2009 मध्ये हरियाणा किसान मोर्चाचे महासचिव ही जबाबदारी त्यांना देण्यात आली. तर 2012 मध्ये नायब सिंह सैनी यांना अंबाला भाजप जिल्हा अध्यक्ष बनवण्यात आले. यादरम्यान त्यांनी अनेक पदांवर काम केलं. नायब सिंह सैनी यांचा ओबीसी आणि इतर अन्य मागास वर्गात मोठा प्रभाव ( Haryana ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.