Dighi : हरियाणामधील तिघांनी केली दिघीतील शेतकऱ्याची फसवणूक

एमपीसी न्यूज – हरियाणा येथे जाऊन पसंत केलेल्या (Dighi) गायी न पाठवता त्यापोटी नऊ लाख 26 हजार रुपये घेत हरियाणामधील तिघांनी दिघीतील एका शेतकऱ्याची फसवणूक केली. ही घटना 31 मे ते 11 जुलै या कालावधीत दिघी आणि नलवी खोदगाव कर्नाळ हरियाणा येथे घडली.

राकेश कुमार, रवी खोखर, लालजी (पूर्ण नाव माहिती नाही. रा.नलवी खोदगाव, कुंजपुरा, कर्नाळ, हरियाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शवाजी पोपट तापकीर (वय 47, रा. चऱ्होली, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी हरियाणा येथे जाऊन आरोपींना भेटून दहा गायी खरेदी केल्या होत्या.

Pune Crime : नोकरीच्या आमिषाने महिलांना सौदीत नेऊन विकले; पुणे पोलिसांनी आरोपीला केली मुंबईतून अटक

त्या गायी आरोपी पाठवून देणार (Dighi) असल्याचे ठरले होते. त्याचे नऊ लाख 26 हजार रुपये फिर्यादी यांनी आरोपींना दिले. मात्र आरोपींनी फिर्यादी यांनी निवडलेल्या गायी त्यांना न पाठवता दुसऱ्या गायी पाठवल्या. तसेच त्या गायी देखील फिर्यादी पर्यंत न पोहोचवता फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.\

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.