Haryana : नोकरी सोडून शेतीत रमला.. आता पेरूची शेती करून कमवतोय करोडो रुपये

पारंपरिक शेतीला बगल देऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर

एमपीसी न्यूज :  हरियाणातील राजीव भास्कर या तरुणाने चक्क चांगल्या पगाराची नोकरी सोडून थाई जातीच्या पेरूची यशस्वी लागवड करत शेतीतून करोडो रुपये मिळविले आहेत. 25 एकर क्षेत्रावर थाई पेरूची लागवड करून  राजीव भास्करने करोडो रुपये कमवून नवीन तरुणांना शेतीतून उत्तम अर्थार्जन होऊ शकते हे दाखवून दिले आहेत.

राजीव भास्कर हे हरियाणातील पंचकुला (Haryana) येथील आहेत.  2017 साली चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी पंचकुला येथे 5 एकर जमीन भाड्याने घेऊन थाई पेरूची लागवड केली यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला. सुरुवातीच्या काळात सेंद्रिय पद्धतीने पेरूचे पीक घेऊन कमी खर्चात जास्त पैसे मिळविले होते.

2017 साली  राजीव भास्कर यांनी 5 एकर क्षेत्रामधून जवळजवळ 2० लाख रुपये मिळवल्यामुळे त्यांचा थाई पेरूच्या शेतीवर अधिकच आत्मविश्वास वाढला. ह्या आत्मविश्वासाच्या बळावर आणखी थाई पेरूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी 55 एकर जमीन भाड्याने घेऊन त्यातील 25 एकर क्षेत्रात पेरूची लागवड केली.आता या पेरूच्या बागेतून करोडोंचे उत्पन्न ते मिळवू लागले आहेत.

PCMC : पाण्याच्या तक्रारी वाढताच 19 मोटार पंपांवर महापालिकेची कारवाई

राजीव भास्कर ह्यांच्या शेतीचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भाड्याची जमीन घेऊन पेरूची लागवड केली आहे. कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते न वापरता त्यांनी हे भरघोस उत्पन्न मिळविले आहे. किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी थ्री-लेअर बॅगिंग तंत्राचा वापर केला आहे.

राजीव भास्कर (Haryana) यांच्या म्हणण्यानुसार, थाई पेरूच्या बागेतून सेंद्रिय खताचा वापर करून प्रति एकर ते सहा लाख रुपये नफा मिळवत आहेत. तयार झालेला माल ते दिल्लीच्या बाजारात  विक्रीसाठी पाठवतात.  दर वर्षातून पावसाळा आणि हिवाळा अशा दोन ऋतूंमध्ये ते थाई पेरूचे पीक घेतात. त्यांच्या ह्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे शेतीमध्ये नवीन प्रयोग केल्यानंतर भरघोस उत्पन्न काढता येते हे निश्चितच म्हणता येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.