Talegaon : जावयाच्या खून प्रकरणी सासऱ्याला जन्मठेप

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील मारुती मंदिर चौकात ( Talegaon ) ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने मजुरीच्या पैशांच्या कारणावरून जावयाचा कुऱ्हाडीने खून केला होता.

दत्तू बाळू मोहिते (वय 70) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दत्तू मोहिते याने जावई सुनील रामचंद्र जाधव (वय 60, रा. नीलकंठ नगर, तळेगाव दाभाडे) यांचा खून केला होता. याप्रकरणी शुभदा सुनील जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

दत्तू मोहिते याच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो मुलगी शुभदा हिच्याकडे राहत ( Talegaon ) होता. दरम्यान सोमाटणे फाटा येथे शेतमजुरीचे देखील काम करत होता. 20 ऑगस्ट 2020 रोजी दत्तू मोहिते आणि जावई सुनील जाधव यांचे मजुरीच्या पैशांवरून भांडण झाले. घरातील इतर सदस्य दुसऱ्या खोलीत होते. तर एका खोलीत दत्तू आणि सुनील हे होते. दत्तू याने जावई सुनील यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात सुनील गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Haryana : नोकरी सोडून शेतीत रमला… आता पेरूची शेती करून कमवतोय करोडो रुपये

या प्रकरणाची सुनावणी वडगाव मावळ सत्र न्यायालयात सुरु होती. न्यायाधीश जे एल गांधी यांनी याप्रकरणी निकाल दिला आहे. आरोपी दत्तू याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्मिता चौगले यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. चौगले यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करत उच्च न्यायालायचे न्यायनिवाडे सादर केले. देहूरोड विभागाचे सहायक आयुक्त देविदास घेवारे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील, तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक डी आर अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ( Talegaon ) कोर्ट अंमलदार अविनाश गोरे यांनी न्यायालयात पाठपुरावा केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.