Sharad Pawar : “तुम्हाला कोणी सांगितले की, मी म्हातारा झालो म्हणून”, शरद पवारांनी घेतली शेतकऱ्याची फिरकी

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) वयाची 80 वर्ष पूर्ण केली. परंतु या वयातही त्यांचा उत्साह वाखण्याजोगाचा आहे. आजही पायाला भिंगरी लावून ते सतत फिरत असतात. शरद पवार यांच्यात इतकी एनर्जी येथे तरी कुठून असा प्रश्न अनेकांना पडतो. वय हे फक्त नंबर्स असतात हे वाक्य शरद पवारांना पुन्हा पुन्हा लागू पडते. याचाच प्रत्येक पुन्हा एकदा आला.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) सोमवारी पुरंदर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. येथील परिंचे गावात शेतकरी मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यातील एका शेतकऱ्याने शरद पवार यांना विनंती केली की “साहेब आपले वय झाले आहे एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या गावोगावी फिरू नका” असा या शेतकऱ्याने शरद पवारांना म्हटलं.

Missing Cash Returned : दोन लाख रुपये असलेली बॅग बसमध्येच विसरली; वाचा वाहकाने काय केले? 

त्यावर शरद पवार यांनीही या शेतकऱ्याची फिरकी घेताना म्हटले की, तुम्हाला कोणी सांगितलं की मी म्हातारा झालोय तुम्ही काय पाहिलं असा प्रति प्रश्न त्यांनी संबंधित शेतकऱ्याला केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

याच कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. ज्यांच्या हातात देशाची राज्याची सूत्रे आहेत त्यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी काही निर्णय घेणे गरजेचे आहे. मात्र ते घेताना दिसत नाही.

Today’s Horoscope 25 Oct 2022 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा पंधरा दिवसात मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्रात जबाबदारी आली तेव्हाही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते, याची आठवण पवार यांनी यावेळी करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.