Sant Nagaji Maharaj : आळंदीत हरिनामाच्या गजरात संत नगाजी महाराज पुण्यतिथी

एमपीसी न्यूज – आळंदीमधील संत गोपाळपूर मंदिरात विदर्भातील श्री संत नगाजी महाराज (Sant Nagaji Maharaj) यांची पुण्यतिथी हरिनामाच्या गजरात साजरी करण्यात आली. यावेळी येथे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री संत नगाजी महाराज (Sant Nagaji Maharaj) यांचा गोपाळपूर येथील  मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात झाला. यामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा झाला.  या सोहळ्यात भजन, कीर्तन, हरिपाठ, श्रींची पूजा आदी धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले.

Alandi Laxmi Pujan : आळंदीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूचा भाव पोहचला 200 रुपयांवर

यावेळी परिसरातून श्रींच्या दर्शनासह मोठ्या प्रमाणात अन्नदान उपक्रमाचा भाविक, भक्तांनी लाभ घेतला. या सप्ताहाचे संयोजन गणेश महाराज दाभेकर यांनी  केले.

यावेळी ह. भ. प. लक्ष्मण महाराज दाभेकर यांचे मार्गदर्शन सप्ताहास मिळाले. याबततची माहिती अर्जुन मेदनकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.