Alandi Laxmi Pujan : आळंदीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूचा भाव पोहचला 200 रुपयांवर

एमपीसी न्यूज – आळंदी येथे सोमवारी सकाळपासून दिवाळीनिमित्त लक्ष्मी मूर्तींना, लक्ष्मी (केरसुणींनी) तसेच लक्ष्मीपूजनाकरिता (Alandi Laxmi Pujan) लागणाऱ्या विविध साहित्यांनी व झेंडूच्या फुलांनी येथील बाजारपेठ फुलून गेली होती.

प्रदक्षिणा रस्ता, मरकळ रस्ता, वडगांव चौक, चावडी चौक अशा अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने लक्ष्मीपूजनानिमित्त (Alandi Laxmi Pujan) लागणाऱ्या साहित्य, वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसत होती. त्या दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत होती.

Missing Cash Returned : दोन लाख रुपये असलेली बॅग बसमध्येच विसरली; वाचा वाहकाने काय केले? 

आळंदीमध्ये सोमवारी सकाळी झेंडूच्या फुलांचा भाव 50 ते 70 रु.किलो इतका होता. तो दुपारी व संध्याकाळी 200 रुपये किलोपर्यंत पोहचला होता. यंदा शहरात झेंडूची आवक कमी प्रमाणात झाली होती. त्यामुळे फुलांची टंचाई शहरात जाणवत होती.लक्ष्मी पूजन निमित्त आळंदी व आजूबाजूच्या परिसरातील नागरीक आळंदीमध्ये झेंडूची फुले खरेदी करत असतात.यामुळे झेंडूच्या फुलांना येथे मोठ्या प्रमाणात मागणी असते.

Today’s Horoscope 25 Oct 2022 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य

लक्ष्मी (केरसुणी) भाव चाळीस ते पन्नास रुपये 1 नग असा राहिला. घरोघरी तसेच विविध दुकानांमध्ये लक्ष्मीपूजन (Alandi Laxmi Pujan) हे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात, आनंदात साजरे करण्यात येत होते. यावेळी संत ज्ञानेश्वर संजीवन मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.