Pune : लक्ष्मीपूजनानंतर शहरात विविध ठिकाणी फटाक्यांमुळे 27 आगीच्या घटना; जखमी वा जिवितहानी नाही

एमपीसी न्यूज – लक्ष्मीपूजनानंतर रविवारी सायंकाळी शहर, तसेच (Pune) मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. या फटाक्यांमुळे वेगवेगळ्या भागात आगीच्या 27 घटनांची नोंद झाली आहे.  मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने कोठे ही जखमी वा जिवितहानीची झाली नाही.

Maharshtra : सौर पंप स्थापित करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर; अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्य अग्रेसर

अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षात नागरिकांनी आग लागल्याच्या तक्रारी नोंदविल्या. रविवारी सायंकाळी साडेसात ते सोमवार 13  नोव्हेंबर सकाळी 07.00 वाजेपर्यंत 27 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

आगीच्या घटना घडलेल्या  वेळ व ठिकाणे

1) वेळ राञी 07.38 – रास्ता पेठ, के ई एम हॉस्पिटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग.

2) वेळ राञी 07.40 – कोथरुड, सुतार दवाखान्या जवळ दुकानामध्ये आग.

3) वेळ राञी 08.18 – वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग.

4) वेळ राञी 08.24 – कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचरयाला आग.

5) वेळ राञी 08.50 – नाना पेठ, चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरामध्ये आग.

6) वेळ राञी 08.52 – घोरपडी पेठ, आपला मारुती मंदिराजवळ झाडाला आग.

7) वेळ राञी 08.57 – कोंढवा, शिवनेरी नगर येथे इमारतीत टेरेसवर आग.

08) वेळ राञी 08.58- वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग.

09) वेळ राञी 09.00 – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग.

10) वेळ राञी 09.13- केशवनगर-मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीत घरामध्ये आग.

11) वेळ राञी 09.27 – आंबेगाव पठार, चिंतामणी शाळा येथे भंगार दुकानामध्ये आग.

12) वेळ राञी 09.31 – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर तिसरया मजल्यावर आग.

13) वेळ राञी 09.32 – गुरुवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे दुकानामध्ये आग.

14) वेळ राञी 09.50 – हडपसर, रासकर चौक येथे एका घरामध्ये आग.

15) वेळ राञी 09.51 – पिसोळी, खडी मशीन चौक येथे अदविका फेज 1येथे घराच्या गॅलरीमध्ये आग.

16) वेळ राञी 10.58 – रास्ता पेठ, आगरकर शाळेजवळ छतावर कागदाला आग.

17) वेळ राञी 10.09 – लोहगाव, शिवनगर, वडगाव शिंदे रोड इमारतीत गॅलरीमध्ये आग.

18) वेळ राञी 10.23 – विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ इमारतीत गॅलरीत आग.

19) वेळ राञी 10.28 – वडारवाडी, पांडव नगर येथे घरामध्ये आग.

20) वेळ राञी 10.34 – धानोरी, विठ्ठल मंदिर येथे गवताला आग.

21) वेळ राञी 10.43 – गुरुवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ घरामध्ये आग.

22) वेळ राञी 10.52 – बी टी कवडे रोड, सोलेस पार्कसमोर घरामध्ये आग.

23) कोंढवा, शिवनेरी नगर, ब्रम्हा एवेन्यू सोसायटी येथे गच्चीवर टॉवरला (Pune) आग.

24) वेळ राञी 12.38 – गुरुवार पेठ, गोरी आळी येथे वाड्यामध्ये आग

25) वेळ राञी 12.50- रास्ता पेठ, अपोलो थिएटर जवळ इमारतीत बाल्कनीमध्ये आग

26) वेळ राञी 02.06 – औंध, आंबेडकर चौक येथे कचरयाला आग

27) वेळ राञी 03.14 – बुधवार पेठ, तपकीर गल्ली दुकानामध्ये आग

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.