India : ‘स्काय डायव्हर’ शीतल महाजन हिचा आणखी एक विक्रम; माउंट एव्हरेस्टजवळ 12 हजार फूट उंचीवर घेतली भारतीय ध्वजासह उडी

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध ‘स्काय डायव्हर’ शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग ( India ) क्षेत्रात अनेक विक्रम केले आहेत. धाडसी स्काय डायव्हिंगसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी असाच एक विक्रम ऐन दिवाळीच्या दिवशी केला आहे. रविवारी (दि. 12) माउंट एव्हरेस्ट पर्वताजवळ तब्बल 12 हजार 450 फूट उंचीवर त्यांनी भारतीय ध्वजासह उडी घेत भारतीयांना दिवाळीची आनंदी भेट दिली आहे.

माउंट एव्हरेस्टच्या पर्वतरांगांमध्ये उडी घेतल्यानंतर त्यांनी एव्हरेस्टच्या पर्वतरांगांमध्ये भारतीय तिरंगा फडकवला. स्यांगबोचे येथे 12 हजार 450 फूट उंचीवर उतरलेली ही उडी शीतल महाजन यांच्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. महाजन सांगतात की, “माझ्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम उडी आहे.

Pune : लक्ष्मीपूजनानंतर शहरात विविध ठिकाणी फटाक्यांमुळे 23 आगीच्या घटना; जखमी वा जिवितहानी नाही

उंचीवरील स्काय डायव्हिंगसाठी काळजीपूर्वक तयारी आवश्यक आहे. महाजन यांच्या सोबत पॉल-हेन्री डी बेरे, ओमर अल्हेगेलन, वेंडी एलिझाबेथ स्मिथ आणि नादिया सोलोव्हिएवा आदी दिग्गज गिर्यारोहण तज्ञ होते. या प्रत्येक गिर्यारोहकाला जगभरात गिर्यारोहणाचा 12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

नेपाळमधील एव्हरेस्ट स्कायडायव्ह ऑर्गनायझेशनने या प्रवासासाठी मदत केली. सन 2008 पासून दरवर्षी माउंट एव्हरेस्टजवळ स्कायडायव्हिंगचे आयोजन केले जाते.

भारतीय महिलेने एव्हरेस्ट प्रदेशात ध्वजासह स्कायडायव्हिंग पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शीतल महाजन यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. या गिर्यारोहणासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे महाजन यांनी आभार ( India ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.