Missing Cash Returned : दोन लाख रुपये असलेली बॅग बसमध्येच विसरली; वाचा वाहकाने काय केले? 

एमपीसी न्यूज – कात्रज ते कोथरूड डेपो या पीएमपीएमएलच्या बसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची दोन लाख रुपये असलेली बॅग बसमध्येच विसरली, मात्र काही वेळानंतर या प्रवाशाला ही बॅग आणि बॅगेतील रोख रक्कम (Missing Cash Returned) संपूर्ण परत मिळाले.

पीएमपीएमएलच्या वाहकाने प्रामाणिकपणा दाखवत ही बॅग कोथरूड डेपो मध्ये तातडीने जमा केली होती. बॅग आणि त्यातील रोख रक्कम कागदपत्रासह संबंधित बॅगमालकाच्या ताब्यात देण्यात आली.

कात्रज परिसरात राहणारे दत्ता जनार्दन निगडे हे कात्रजवरून कोथरूडच्या दिशेने जाणाऱ्या बस मध्ये बसले होते. उतरताना बॅग ते बसमध्येच विसरले, मात्र बसचे वाहक संजय कदम यांना सीट खाली आढळलेली बॅग त्यांनी तातडीने कोथरूड डेपोमध्ये (Missing Cash Returned) जमा केली.

Nehru Raod Accident : दिवाळीच्या दिवशी अपघात, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

बॅगेत तब्बल दोन लाखाची रोख रक्कम आणि इतर कागदपत्रे होती. मात्र कुठल्याही लोभाला बळी न पडता त्यांनी ती बॅग आहे तशी जमा केली होती आणि त्यानंतर ते आपल्या कामावर निघूनही गेले होते.

Aundh Accident : बेकायदा वीज जोड घेताना विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आपली बॅग हरवल्याची लक्षात येताच दत्ता निगडे यांचे धाबे दणाणले त्या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार देखील केली होती. मात्र काही वेळातच आपली बॅग सुखरूप (Missing Cash Returned) असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला.

कोथरूड डेपोमध्ये जाऊन त्यांनी बॅग ताब्यात घेतली आणि निगडे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.