Nigdi : पीएमपीएमएल बस वाहकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलमध्ये काम करणाऱ्या वाहकाच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत यश संपादन केले. याबद्दल निगडी (Nigdi) आगारात पिता पुत्राचा सत्कार करण्यात आला.

Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैल फाउंडेशनच्या वतीने मदत

चेतन ओच्छानी हे पीएमपीएमएलच्या भक्ति-शक्ती आगारात वाहक पदावर काम करतात. त्यांचा मुलगा राहुल ओच्छानी याने सनदी लेखापाल परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनच्या वतीने ओच्छानी पिता पुत्राचा आगार व्यवस्थापक यशवंत हिंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कामगार नेते रविंद्र लांडगे, संतोष शिंदे, प्रफुल्ल शिंदे ,आकाश तिवारी, उमाजी शिंदे, तुकाराम खानेकर यांच्यासह चालक, वाहक उपस्थित होते. आगार व्यवस्थापक यशवंत हिंगे म्हणाले, “राहुल यांनी आपल्या वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. पीएमपीएमएल आणि ओच्छानी कुटुंबियांचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन हिंगे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.