PCMC : विद्यार्थ्यांनी समाजकार्याची भावना बाळगावी – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज : समाजात विद्यार्थी हे जास्त (PCMC) प्रमाणात जागरूक असतात. त्यांनी आपली क्षमता ओळखून समाज कार्याची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपले कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाज घटकांशी संवाद साधला जातो. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील भारताचे नागरिक आहेत. त्यांच्या मनातील विविध विचार, प्रश्न जाणून घेणे हे शहराच्या विकासाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरते.

त्या अनुषंगाने मंगळवारी आयुक्त सिंह यांचा शहरातील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे प्राचार्य मनोज देवळेकर, पर्यवेक्षक सुधीर कुलकर्णी, पर्यवेक्षिका कल्याणी पटवर्धन उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उषा मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आयुक्तांशी थेट संवाद साधला. त्यांना विविध प्रश्न विचारले.

या प्रश्नांना आयुक्तांनी अत्यंत समर्पक उत्तरे दिली. शहराचा विकास, त्यासंदर्भात आपली भूमिका इत्यादी विषयांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना आपले पालक, आपल्या शेजारी राहणारे नागरिक यांना पर्यावरणाविषयी जागरूक करता येऊ शकते. सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर बंद करणे, रूममध्ये कुणी नसल्यास (PCMC) लाईट बंद करणे अशा छोट्या छोट्या कृतींमधून आपण पर्यावरणाविषयी जागृती करू शकतो.

Nigdi : पीएमपीएमएल बस वाहकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल

तसेच विद्यार्थ्यांनी स्वत:च्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. ज्या क्षेत्रामध्ये रस आहे त्यामध्ये झोकून देऊन काम केले पाहिजे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात मनापासून काम करून देशासाठी संपूर्ण योगदान देऊ शकतो. पूर्वीपासूनच संपूर्ण देशातून शहरांमध्ये लोकांचे स्थलांतर होत आहे.

शहरांमध्ये असलेल्या आर्थिक विकासाच्या संधींमुळे नागरिक शहरामध्ये येतात. गेल्या काही वर्षांत पिंपरी चिंचवडची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये शहराचा विस्तार झाला. तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करण्यात आला.

नव्याने नैसर्गिक साधन संपत्तीचे स्रोत तयार करणे आणि आहे त्या जमिनीची उत्पादकता वाढवणे हे त्या वरील उपाय आहेत. पर्यावरणपूरक विकास करणे ही काळाची गरज असल्याचे आयुक्त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.