Pune : पीएमपीएमएलकडून पंधरा दिवासात 3 लाख 92 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल ने 1 ते 15 ऑक्टोबर या पंधरा (Pune) दिवसाच्या कालावधीत फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून 3 लाख 92 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

‘पीएमपीएमएल’ने 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत बसेस(Pune)तपासणी दरम्यान बसेसची तपासणी करण्यात आली. ‘पीएमपीएमएल’ बस मधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी यांना ‘पीएमपीएमएल’ कडून प्रती प्रवासी 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Chinchwad : करोडपती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांचे निलंबन

त्यानुसार 619 प्रवाशांकडून 3 लाख 92 हजार 500 रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.यात 9 ऑक्टोबर रोजी सर्वात जास्तदंड वसूल करण्यात आला असून या दिवशी 37 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 1 ऑक्टोबर रोजी सर्वात कमी म्हणजे 11 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.ही कारवाई यापुढेही अशीच सुरु राहणार असून अचानकपणे बस थांबवून प्रवाशांचे तिकीट तपासले जातात.

त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना तिकीट काढून प्रवास करावा व दंडाचा कारवाई टाळावी, शे आवाहन पीएमपीएमएल तर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.