Maval : टाकवे बुद्रुक येथील शिवशाही मित्र मंडळातर्फे नेत्र तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील शिवशाही मित्र मंडळाने (Maval) नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून टाकवे बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेतले.यामध्ये 160 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. ज्या नागरिकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना नारायणगाव येथे रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

याप्रसंगी टाकवे गावचे माजी उपसरपंच स्वामी जगताप, (Maval) विकास सोसायटीचे माजी संचालक दिलीप आंबेकर,मंडळाचे सचिव बाबाजी असवले,संभाजी धामणकर,विष्णू लोंढे,शंकर गुणाट,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मोढवे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य नवनाथ आंबेकर,सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गायकवाड, टाकवे विविध विकास सोसायटीचे माजी संचालक नंदकुमार असवले,कामगार नेते प्रकाश करवंदे आदींसह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

PCMC : प्रशासक सुसाट! अडीच हजार कोटींच्या कामांना मान्यता

टाकवे बुद्रुक येथील शिवशाही मित्र मंडळ हे प्रत्येक वर्षी गणेश उत्सव, शिवजयंती,नवरात्र,दहीहंडी या सणांबरोबर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करत असते.यावर्षी मंडळाने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून टाकवे बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.यामध्ये अंदर मावळ व टाकवे परिसरातील 160 लोकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली व त्यामध्ये ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा व्यक्तींना पुढील उपचाराकरता नारायणगाव येथे रुग्णालयामध्ये उपचाराकरीता पाठवले आहे.

हा उपक्रम राबवल्याबद्दल आंदर मावळ परिसरातून या मंडळावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हया शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.