Pune : जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत एंजल मिकी मिनी हायस्कूलला उपविजेतेपद

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका (Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज, हडपसर या शाळेच्या संघाला विजेतेपद तर एंजल मिकी मिनी हायस्कूल या शाळेच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.

या स्पर्धेत पुणे शहरातील एकूण 200 शाळांनी आपला सहभाग नोंदवला. (Pune) यामध्ये एकूण आठ फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळवून अंतिम सामन्यामध्ये शाळेच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले.

Pune : पीएमपीएमएलकडून पंधरा दिवासात 3 लाख 92 हजार रुपयांचा दंड वसूल

या संघास शाळेचे क्रीडा शिक्षक योगेश शेटे,उदय गुरव,अभिजीत साळुंखे व प्रिया सरकार यांच्या मार्गदर्शन लाभले शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता खेडकर व उपमुख्याध्यापिका रशिदा सामी यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.