Chinchwad : करोडपती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांचे निलंबन

एमपीसी न्यूज – एका दिवसात करोडपती झालेले (Chinchwad)पिंपरी चिंचवडचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. झेंडे यांनी एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दीड कोटींची रक्कम जिंकली. त्याबाबत प्राथमिक चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना(Chinchwad) एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दीड कोटींचे बक्षीस मिळाले. त्यानंतर याबाबत साधक बाधक चर्चा सुरू झाली. पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी अशा प्रकारे पैसे लाऊन खेळ खेळला. असल्याने त्याबाबत काही जणांनी त्यावर आक्षेप घेतले.

Nigdi : निगडीत रंगला आगरवाल बांधवांचा एक “नई उडाण” हा सांस्कृतिक महोत्सव 

या प्रकरणाची पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडून प्राथमिक चौकशी केली गेली. प्राथमिक चौकशी अंती झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशी उपायुक्त बापू बांगर यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली.

त्यामुळे या प्रकरणात आता पुढे आणखी काय कारवाई होणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.