Aundh Accident : बेकायदा वीज जोड घेताना विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – दिवाळीसाठी आकाश कंदील विक्री करताना त्यासाठी बेकायदेशीर वीज जोड घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी औंध परिसरात (Aundh Accident) ही घटना घडली.

प्रवीण अशोक माने (वय 38) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की औंध येथील आयटीआय जवळ (Aundh Accident) प्रवीण माने आणि महिला शांताबाई पांडुरंग खंदारे (वय 32) त्यांनी दिवाळीनिमित्त आकाश कंदील विक्रीचा दुकान थाटले होते. या दुकानासाठी जवळच असणाऱ्या फिडर पिलर मधून त्यांनी वीज घेण्याचा प्रयत्न केला.

Today’s Horoscope 25 Oct 2022 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य

बेकायदेशीर रित्या वीज जोड घेत असतानाच प्रवीण माने याला उच्च दाब फिडरचा जोरदार धक्का लागला. , यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात (Aundh Accident) याप्रकरणी प्रवीण अशोक माने आणि शांताबाई पांडुरंग खंदारे यांच्या विरोधात भारतीय वीज कायद्याच्या कलम 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण चे सहाय्यक अभियंता मनोज प्रभाकर नेमाडे यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.