Raju Misal Diwali Pahat : ‘स्वरपहाट सप्तसूर’ या संगीतमय कार्यक्रमाने रंगली दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज – मैत्री महिला व्यासपीठ आणि राजमुद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वरपहाट सप्तसूर’ या संगीतमय कार्यक्रमाचे (Raju Misal Diwali Pahat) आयोजन करण्यात आले होते. प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 27 येथील गजानन महाराज मंदिरातील प्रांगणात शेकडो रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

माजी नगरसेवक राजू मिसाळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरपहाट सप्तसूर’ या कार्यक्रमात (Raju Misal Diwali Pahat) आनंदी जोशी, मंगेश बोरगावकर, जुईली जोगळेकर, पद्मनाभ गायकवाड आणि अंजली गायकवाड हे गायक व स्वानंदी टिकेकर आणि यशोमन आपटे हे कलाकार सहभागी झाले होते. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे 18 वे वर्ष होते.

गायक मंगेश बोरगावकर याने येई हो विठ्ठले तसेच अबीर गुलाल ऊधळीत रंग या भक्तीरचनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर गायिका जुईली जोगळेकर हिने आयुष्यावर माझ्या होती अंधाराची जागा ही भक्तीरचना सादर केली. कान्हा आन पडी मै तेरे व्दार हे अंजली गायकवाड तर दत्त दर्शनाला जायाच आनंद पोटात माझ्या माईना या गीताला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली.

आनंदी जोशी यांनी खेळ मांडीयेला वाळवंटी घाई तर स्वानंदी टिकेकर यांनी कबीराचे वीणतो शेले हे गीत सादर केले.
पद्मनाभ गायकवाड याने लंगडा ग लंगडा देव एक पायाने लंगडा ही गौळण सादर केली.लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा,मन उधाण वा-याचे,मन धागा जोडते नवा,मनमंदिरा,तुरु तुरु चालु नको,अशा बहारदार गीतांनी उत्तरोत्तर कार्यक्रमाची (Raju Misal Diwali Pahat) रंगत वाढत गेली.

या कार्यक्रमासाठी कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील, सुलभा उबाळे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक शंकर जगताप, अमित गावडे, शांताराम भालेकर, प्रशांत शितोळे, राजेश पिल्ले, उद्योजक शशिकांत आखाडे, आबा ताकवणे, लक्ष्मण काचोळे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी पांढरे, इकलास सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

बुधवार दि. 26 ऑक्टोबर रोजी प्राधिकरणातील गणेश तलाव येथे सायंकाळी सहा वाजता भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा सर्व नागरिकांनी आनंद घ्यावा, असे संयोजक राजू मिसाळ यांनी यानिमित्ताने आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.