Chinchwad : महापालिकेतर्फे शुक्रवारी दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी दिवाळी (Chinchwad ) पहाटचे आयोजन केले जाते. यावर्षीही “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी दिवाळी  पहाट 2023” चे  प्रा. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  शुक्रवार पहाटे 5.30 ते सकाळी 10 पर्यंत  आयोजन करण्यात आले आहे.

PCMC : वायू प्रदूषण रोखण्यासाठी वायु प्रदूषण देखरेख पथक

या दिवाळी  पहाट कार्यक्रमाचे उद्घाटन पहाटे 5.30  वाजता होणार असून त्यानंतर सकाळी 6 वाजता चिराग कट्टी यांचे सतार वादन होणार आहे.

तर सकाळी 7 वाजता स्मिता देशमुख यांचे (Chinchwad ) शास्त्रीय गायन तसेच 7.30 वाजता विवेक सोनार आणि मानस कुमार यांचे बासरी वादन होणार आहे . या दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता सकाळी  8.30 वाजता शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय गायनाने  होणार आहे.

हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामुल्य असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर तसेच युट्यूब चँनेलवर करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रिडा विभागाचे उप आयुक्त मिनिनाथ दंडवते यांनी  दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.