Pimpri : नेक्स्ट अकॅडमीचा सौम्य सोनिग्रा ठरला सामनावीर  

एमपीसी न्यूज – 14 वर्षाखालील वेरॉक चषक क्रिकेट (Pimpri) स्पर्धेत पुना क्लब विरुद्ध क्रिकेट नेक्स्ट अकॅडमी यांच्यात झालेल्या सामन्यात क्रिकेट नेक्स्ट अकॅडमीने पुना क्लबवर 3 गड्यांनी विजय मिळवला. या सामन्यात पुना क्लब संघाला 73 धावांमध्ये रोखण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सौम्य सोनिग्रा याने 4 गडी बाद करत सामनावीराचा मान पटकावला. हा सामना राजीव गांधी क्रीडा संकुल येथील वेंगसरकर मैदानावर झाला.

पुना क्लबने प्रथम फलंदाजी करताना 33. 2 षटकांत सर्वबाद 73 धावा केल्या. अर्जुन देशमुख याने नाबाद 19 धावा केल्या. नेक्स्ट अकादमीच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. सौम्य सोनिग्रा याने 9 षटकांत 22 धावा देत 4 गडी बाद केले. शौर्य जाधव आणि शौर्य देशमुख यांनी प्रत्यकी 2 बळी मिळवले.

Chinchwad : महापालिकेतर्फे शुक्रवारी दिवाळी पहाट

पुना क्लबने दिलेल्या 74 धावांचा पाठलाग करताना वेदांत पाटील नाबाद 27 धावा, मिहीर गुजरने 14 धावांचे योगदान दिले. 32.5 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात नेक्स्ट अकादमीने हे लक्ष्य पार केले. 4 गाडी बाद करणारा सौम्य सोनिग्रा हा सामनावीर ठरला.

14 वर्षाखालील व्हेरॉक चषकाचा अंतिम सामना 9 नोव्हेंबर 2023 रोजी व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी विरुद्ध आर्यन्स क्रिकेट अकॅडमी यांच्या दरम्यान खेळला जाणार (Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.