Nigadi : भक्ती शक्ती शिल्पा लगतची जागा शिवजयंती व सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव ठेवा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – भक्ती शक्ती समूह शिल्पा लगतच्या ( Nigadi ) पीएमआरडीची पेठ क्र.24 येथील जागा शिवजयंती उत्सव व इतर सर्व सार्वजनिक उपक्रमाकरिता कायमस्वरूपी राखीव ठेवण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे माजी नगरसदस्य मारोती भापकर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे.   यावेळी मारुती भापकरसचिन चिखलेअण्णा कसबेप्रकाश जाधवब्रह्मानंद जाधवरोहिदास शिवणेकरविश्वनाथ जगतापसंदिपान झोंबाडेकाशीनाथ जगताप,सुनील शिंदेसचिन कदमप्रदीप घोडके,संजय धुतरडमल इशुबभाई मकसाथे आदी उपस्थित होते.

निवेदनात भापकर म्हणाले,  पिंपरी चिंचवड शहरातील प्रवेशद्वारावर भक्ती शक्ती समुहशिल्प बसवण्यात आले आहे. हे शिल्प शहराची ओळख असून या शिल्पा समोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचाही पुतळा आहे. मागील 20 ते 25  वर्षापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका व समितीच्या वतीने या महामानवांची जयंती उत्सव याच जागेत संपन्न होतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पीएमआरडीए अध्यक्ष झाल्यानंतर ही जागा मागील वर्षी पीएमआरडीने लिलाव करून विक्री केली आहे. फेब्रुवारी 2022 पासून भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने ही जागा सार्वजनिक उपक्रमासाठी कायमस्वरूपी राखीव राहावी, या मागणीसाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करित आहोत.

Chinchwad : महापालिकेतर्फे शुक्रवारी दिवाळी पहाट

आपण पुढाकार घेऊन शासन आपल्या दारी हा कार्यक्रम थेरगाव येथे आयोजित केला होता. त्यावेळी आपल्या मध्यस्थीने आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळी आपल्या समोर “अरे हे सरकार तुमचे आहे” पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांना मुख्यमंत्र्यांनी जवळ बोलावून “ती शिवजयंती उत्सवाची जागा यांना देऊन टाका असे स्पष्ट आदेश आपल्या व पोलिसांसमोर दिले.

त्यानंतर  महिवाल यांनी माता अमृतामय शाळेच्या लगतची यमुनानगर येथील 1 एकर जागा या कार्यासाठी महापालिकेला देण्याचा निर्णय जाहीर केला. ही जागा या शिल्पांपासून खूप लांब व लोक वस्तीत आहे. त्यामुळे ही जागा काही उपयोगाची नसून पेट क्र. 24 हीच जागा मिळावी अशी आमची मागणी आहे.

Pimpri : नेक्स्ट अकॅडमीचा सौम्य सोनिग्रा ठरला सामनावीर  

यावर पीएमआरडी आयुक्त राहुल महिवाल यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल बिल्डर धारजींनी, अर्धवट, अपुरा दिला आहे. या जागेत शिवजयंती,अण्णाभाऊ साठे जयंती, तुकोबारायांचा पालखी सोहळा, भारताचा तिरंगा ध्वज, तसेच या विभागात वाढवून दिलेला एफ.एस.आय. त्यामुळे या विभागात वाढणारी लोकसंख्या,

पूर्वीचे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पीएमआरडीए मध्ये विलीन करण्याच्या विरोधात आमदार कै. लक्ष्मण जगताप यांनी केलेला विरोध व मा. मुंबई उच्च न्यायालय मध्ये त्यांची प्रलंबित असणारी याचिका याबाबत महिवाल यांनी या जागेबाबत देण्यात आलेल्या अहवालात मुख्यमंत्र्यांसमोर वस्तुस्थिती मांडलेली नाही.

 त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या जागेबाबत पी एम आर डी ए ने केलेल्या प्रक्रियाप्रमाणे बिल्डरांना ही जागा द्यावी अशा प्रकारचा आदेश दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा आदेश बिल्डरांच्या बाजूने असून छत्रपती शिवराय, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, जगद्गुरु तुकोबाराय, भारताचा तिरंगा ध्वज व पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या विरोधात आहे.   असल्याचेही त्यांनी यामध्ये नमूद केले आहे.

पीएमआरडीची ही जागा वरील सर्व सार्वजनिक उपक्रमासाठी कायमस्वरूपी राखीव राहावी या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठराव केला आहे. तसेच भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यांच्या वतीने देखील हजारो लोकांच्या उपस्थितीत ही जागा कायमस्वरूपी राखीव राहावी असा प्रस्ताव हात वर करून मंजूर केला आहे.

याबाबत पीएमआरडीए महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला माहिती आहे. आपणाला आम्ही या प्रस्तावाच्या प्रती देत आहोत. तरी या जागेबाबत आपण पुन्हा एकदा खरी वस्तुस्थिती  मुख्यमंत्री यांच्या यांच्यासमोर ठेवून त्यांना समजावून सकारात्मक निर्णय करून घ्यावा. अशी विनंतीही त्यांनी याद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हंटले आहे की, मागणीनुसार जागा राखीव न झाल्यास आम्हाला पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल. यातून निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत आपले शासन जबाबदार राहील कृपया याची नोंद घ्यावी,  असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे. संबंधित आशयाचे निवेदन पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, तहसीलदार ( Nigadi ) अर्चना निकम यांनाही देण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.