Pimpri : पिंपरी चिंचवड हे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित (Pimpri) शहरांपैकी एक म्हणून उदयाला येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत  शहराची PM2.5 पातळी तब्बल 103-121 µg/m³ पर्यंत पोहोचली आहे – सुरक्षित पातळीच्या दुप्पट पटीने वायू पातळी खराब होत चालली आहे. हवेची घसरती पातळी पाहता या बाबतीत त्वरीत  उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

पिंपरी चिंचवडसाठी पीएम 2.5 पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डेटावर आधारित ऊर्जा आणि स्वच्छ हवेच्या संशोधन केंद्राने (CREA) विश्लेषित आणि संकलित केली होती. कणिक पदार्थांच्या या पातळीने 60 µg/m च्या राष्ट्रीय वातावरणीय वायु गुणवत्ता मानके (NAAQS) ओलांडली आहेत.

Nigadi : भक्ती शक्ती शिल्पा लगतची जागा शिवजयंती व सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव ठेवा – मारोती भापकर

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सुरु असलेली बांधकामे सध्या वायू प्रदुषणात मोठी भर पाडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बांधकामामुळे होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी टीम स्थापन करण्याची योजना आखली जात आहे.

वायुप्रदुषणामध्ये मुंबई, त्यानंतर पुणे, सोलापूर, नागपूर, महाड, लातूर, चंद्रपूर, विरार, औरंगाबाद, बोईसर, बेलापूर, धुळे आणि नाशिक यांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (पीसीबी)संपूर्ण महाराष्ट्रातील शहरांमधील उच्च प्रदूषण पातळी जोडण्यासाठी (Pimpri) कृती योजना तयार केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.