Nigadi : ‘आयएमए’ तर्फे संदीप उबाळेंच्या दिवाळी स्वर पहाट कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दि.4 नोव्हेंबर रोजी ( Nigadi) सकाळी 5.45 ते 9.00 या कालावधीत ग .दि.माडगुळकर नाट्यगृह, प्राधिकरण निगडी येथे  दिवाळी स्वर पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमात इंडियन आयडॉल व झी सारेगामा फायनलिस्ट संदीप उबाळे,  सुर नवा ध्यास नवा विजेती सन्मिता धापटे शिंदे,  सुप्रसिद्ध पार्श्वगायिका स्वप्नजा लेले , सुप्रसिद्ध पार्श्वगायक सौरभ दफ्तरदार  हे कलाकार सहभागी होणार आहेत.

 हा कार्यक्रम आयएमए सभासद, कुटुंबीय आणि मित्र परिवार सगळ्यांसाठी विनामूल्य आहे.  या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन आयएमए पीसीबी चे अध्यक्ष डॉ.सुशिल मुथियान,डॉ.अनिरुद्ध टोणगावक, डॉ.संजीवकुमार पाटील यांच्यासह आयएमए संचालक मंडळाने केले आहे.

Maratha Reservation : आंदोलकांच्या धमकीनंतर अजित पवारांच्या दौंड साखर कारखान्याचे मोळी पूजन करणार ‘ही’ व्यक्ती

आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी डॉक्टरांची संस्था आहे. ही संस्था फक्त डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचंच काम करत नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याच्या माध्यमातून बरीच समाजोपयोगी कार्य करत करत असते. त्याच पद्धतीने आयएमए पीसीबी म्हणजे आयएमए पिंपरी चिंचवड भोसरी शाखेतर्फे असे उपक्रम राबवले जातात.

उदाहरणार्थ यावर्षी “आओ गांव चले” ह्या उपक्रमाअंतर्गत आयएमए पीसीबी ह्या वर्षात मावळातील गोडुंब्रे ह्या गावात मोफत आरोग्य शिबिर, विद्यार्थी प्रशिक्षण,वृक्षारोपण,गणपती मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण,निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम राबवत आहे.

त्याचप्रमाणे डॉक्टर्स मंडळी आपले ताणतणाव कमी करण्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत असतात. जे सर्वांसाठी विनामूल्य ठेवले जातात. तसंच यावर्षी सुद्धा सालाबादप्रमाणे  दिवाळीपहाट साजरी होणार ( Nigadi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.