Talegaon Dabhade : आवश्यक नागरी सुविधांसाठी तळेगावच्या नागरिकांचे गुरुवारी उपोषण

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून तळेगावमधील (Talegaon Dabhade)  नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा व्यवस्थित पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. 2) सकाळी 10 वाजता नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर (वय 94 वर्ष) हे करणार आहेत.

Nigadi : ‘आयएमए’ तर्फे संदीप उबाळेंच्या दिवाळी स्वर पहाट कार्यक्रमाचे आयोजन

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर यांच्याबरोबर नगरसेवक अरुण बबनराव माने, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव जयंतराव कदम,माहिती अधिकार कार्यकर्ते जमीर नालबंद आदी उपोषणाला बसणार आहेत.

तळेगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना गेली अनेक दिवसांपासून प्रामुख्याने पाणी, रस्ते,आरोग्य, स्वच्छता आदी नागरी सुविधा मिळतच नाही. त्या सुविधा पासून वंचित ठेवणाऱ्या तळेगाव नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराला जनता कंटाळली आहे .

त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि 2) रोजी सकाळी दहा वाजता नगरपालिकेसमोर मारुती मंदिर चौक या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

तसेच या नगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी या उपोषणास पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती देखील आयोजकांकडून करण्यात आली (Talegaon Dabhade) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.