Alandi : आळंदी देवाची येथील पथारी सुरक्षा दलाचा मराठा आरक्षणाला पाठींबा

एमपीसी न्यूज : सकल मराठा समाज आळंदी देवाची व आळंदी सर्कल (Alandi ) यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ 26 ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषणास आळंदी येथील महाद्वार चौकात सुरवात झाली आहे.

Talegaon Dabhade : नागरी सुविधांसाठी तळेगावच्या नागरिकांचे गुरुवारी उपोषण

आज( दि.1) त्या साखळी उपोषणाचा सातवा दिवस सुरू आहे. आजच्या साखळी उपोषणाचे उपोषणकर्ते शशिकांत राजे जाधव आहेत. आज महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल शाखा भाजी मंडई आळंदी देवाची यांच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणा साठी जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.