Today’s Horoscope : 2 November जाणून घ्या आजचे राशिभविष्य 

एमपीसी न्यूज -आजचे पंचांग -Today’s Horoscope –2 November जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

वार – गुरुवार.
02.11.2023
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30ते 3.oo.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.
—————————–
मेष – ( शुभ रंग- राखाडी )
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. आजच्या प्रवासात काही नवीन नाती जुळून येतील. केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )
गोड बोलून आज तुम्ही विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून द्याल. धंद्यातील येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. आवक जरी पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च टाळायला हवा.

मिथुन ( शुभ रंग- मोतिया )
महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती तुमच्या उणिवा शोधण्याचा प्रयत्न करेल. आज देण्या घेण्याच्या व्यवहारात सतर्क राहणे गरजेचे आहे.

कर्क (शुभ रंग- कर्क)
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित प्रवास घडण्याची शक्यता दिसते.

सिंह (शुभ रंग- डाळिंबी)
आजच्या दिवसातील काही मनाजोगत्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध असावे. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)
नोकरीत वरिष्ठांची शाब्बासकी मिळवाल. अधिकार योग चालून येतील. वडील आज योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा कर्तव्यास प्रथम प्राधान्य द्या.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. झटपट लाभाचा मोह सुद्धा टाळायला हवा. स्वतःवर संयम ठेवा.

वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआपच वळतील.

धनु- (शुभ रंग- जांभळा)
महत्त्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असावी. आज एखादा विवाह जुळवण्यात तुम्ही यशस्वी मध्यस्थी करू शकाल.

मकर ( शुभ रंग- भगवा )
नोकरदारांवर वरिष्ठांचा वरदहस्त राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद सामंजस्याने मिटतील.
कुंभ (शुभ रंग – गुलाबी)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ असेल. स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

मीन -(शुभ रंग – आकाशी )
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देतील. आईने दिलेले सल्ले महत्वपूर्ण असणार आहेत.

 

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.