Nigadi :  संदीप उबाळें यांच्या स्वर गायनाने  रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – इंडियनआयडॉल व झीसारेगामा फायनलिस्ट संदीप उबाळे(Nigadi)यांच्या  “सुर निरागस हो,कधी तू.. ,लागा चुनरी मे दाग,कभी मुझमे कही,परदा है परदा,ह्या गाण्यांसहित संभाजी महाराज मालिकेचे शीर्षकगीत सादरीकरणाला, सन्मिता धापटे शिंदे, स्वप्नजा लेले,  सौरभ दफ्तरदार यांनी दिलेल्या सुरेल साथीने रंगलेल्या दिवाळी स्वर पहाट कार्यक्रमात रसिक श्रोते मंत्रमुगध झाले.

आयएमए पिंपरी चिंचवड भोसरी शाखे तर्फे आज (Nigadi)सकाळी  6 ते 9 ह्या वेळेत  ग. दि . माडगुळ्ककर नाट्यगृह प्राधिकरण निगडी येथे दिवाळी स्वर पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसदस्य राजू मिसाळ, अमित गावडे,  रुबी एल्केअर चे संचालक अपूर्व शहा, सन टुरिझमच्या निशिता घाडगे,  डॉ.कामत,  डॉ.सुशिल मुथीयान,  डॉ.टोणगांवकर,  डॉ.विकास मंडलेचा, डॉ.संजीवकुमार पाटील, डॉ.सुहास लुंकड, डॉ.दीपाली टोणगांवकर, डॉ.सुधीर भालेराव,  डॉ.शुभांगी कोठारी यांच्यासह  सुमारे सहाशे पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.
Dehugaon :ऑनलाईन काम करण्याच्या बहाण्याने महिलेनेच केली महिलेची पावणे नऊ लाखांची फसवणूक

सुर नवा ध्यास नवा विजेती सन्मिता धापटे शिंदे यांनी  हे सुरांनो चंद्र व्हा,दिल चीज क्या है. अशी गाणी विशेष दाद मिळवून गेली. स्वप्नजा लेले ह्यांचं अधीर मन झालं,ऐरणीच्या देवा अशी गाणी सुपरहिट झाली.   सौरभ दफ्तरदार ह्यांनी पाहिले मी तुला आणि मै हा झुमरू..असे मराठी आणि हिंदी दोन्ही गाणी जोरात सादर केली.विशाल तेलकर ह्यांच्या गिटारवादनाने वन्स मोर मिळवले . विक्रम भट  यांनी  तबल्यावर ढोलकी वादन करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. वेस्टर्न रिदम सांभाळलं अजय अत्रे यांनी,आणि की बोर्ड  वर मिहिर भडकमकर साथ दिली.


अमृता ठाकूरदेसाई व स्नेहल दामले यांनी सगळी गाणी आपल्या सुंदर निवेदनानं गुंफली.  या सर्व गाण्यांना रसिकांनी खूपच उत्साहात दाद दिली,शेवटच्या झिंगाट गाण्यावर नृत्याचा आनंद घेतला. हा कार्यक्रम आयएमए सभासद,कुटुंबीय आणि मित्र परिवार सगळ्यांसाठी विनामूल्य होता.

आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी डॉक्टरांची संस्था आहे. आणि ही संस्था फक्त डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचंच काम करत नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याच्या माध्यमातून बरीच समाजोपयोगी कार्य करत करत असते.त्याचप्रमाणे डॉक्टर्स मंडळी आपले ताणतणाव कमी करण्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करत असतात.जे सर्वांसाठी विनामूल्य ठेवले जातात.तसंच ह्या वर्षी सुद्धा सालाबादप्रमाणे  दिवाळीपहाट आज शनिवार दि.४नोव्हेंबर सकाळी ६ते ९ ह्या वेळेत  गदिमा मुख्य नाट्यगृह प्राधिकरण  येथे संपन्न झाला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.