Dehugaon :ऑनलाईन काम करण्याच्या बहाण्याने महिलेनेच केली महिलेची पावणे नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईनकाम करण्याचा बहाणा करून एका महिलेने (Dehugaon)दुसऱ्या महिलेची तब्ब्ल 8 लाख 84 हजार 269 रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत देहुगाव येथे घडली.

याप्रकरणी पीडीत महिलेने आरोपी महिलेवरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Thergaon : थेरगाव येथून एकाला 10 किलो गांजासह अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने Dehugaon)मोबाईल फोनवरून ऑनलाईन काम करण्याचा बहाणा बनवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.कामाच्या नावाखाली फिर्यादी महिलेकडे वेळोवेळी पैसे भरण्यास सांगून 8 लाख 84 हजार 269 रुपयांची फसवणूक केली. पैसे परत मागितले असता पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. यावरून फिर्यादी यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, देहुरोड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.