Thergaon : थेरगाव येथून एकाला 10 किलो गांजासह अटक

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी थेरगाव येथील रहाटणी लिंक रोड (Thergaon) येथून एकाला 10.60 किलो वजनाच्या गांज्यासह अटक केली आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी शुक्रवारी (दि.3) दुपारी पाचच्या सुमारास करण्यात आली.

सुशील साळीकराम मोरे (वय 34 रा.थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सौदागर लामतुरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Moshi : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी मोशीतील गायरान जागेचा पर्याय! पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची पाहणी

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या(Thergaon) बातमीनुसार थेरगाव येथे एक जण गांजा विकण्यासाठी येणार होता. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

आरोपी हा पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये एकूण 10.60 कीग्रॅ वजनाचा 1 लाख रुपयांचा गांजा घेऊन थांबला होता. पोलिसांनी त्याला अटक करत वाकड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.