Pimpri : आमदारांचे कार्यालय तोडफोड आणि घराला आग लावल्याच्या निषेधार्थ राज्यपालांना निवेदन

एमपीसी न्यूज – संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थान,गाड्या व कार्यालयाला (Pimpri)तसेच आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड व आग लावल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या वतीने तहसीलदार अर्चना निकम यांच्या मार्फत राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन देण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत (Pimpri )सदैव समन्वयाच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र शासनाशी बोलणी करीत आलेलो आहोत. दि. 29 सप्टेंबर च्या महाराष्ट्र शासनाने बोलावलेल्या सभेमध्ये देखील याबाबत आम्ही आमची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी आमचे दुमत नाही परंतु ते ओबीसीच्या तुटपुंज्या असलेल्या आरक्षणांमधून देऊ नये. त्यांना वेगळे आरक्षण द्यावे तसेच त्यांना सरसकट आरक्षणही देऊ नये, असे आम्ही स्पष्टपणे मांडली होती. त्यास शासनाने मंजुरीही दिली होती.

Hinjawadi : गुंतवणुकीतून आधिक नफ्याचे आमिष दाखवत व्यावसायिकाची सव्वा पाच लाखांची फसवणूक

सामंजस्याची भूमिका घेऊनही जर तेली समाज, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय व ओबीसी समाज हा मराठा आरक्षणासाठी मदत करत असतांना देखील जर मराठा समाजाच्या आंदोलकांनी विरोधकांना विरोध न करता आमच्या मदत करणार्‍या समाजांची घरे जाळत असतील तर हे म्हणजे “पाटलांना दिली ओसरी व पाटील हातपाय पसरी” असेच झाले नां..!’ असे निवेदनात म्हंटले आहे.

तसेच आंदोलकांच्या या चाललेल्या सगळ्या झोटिंगशाहीला (Pimpri)व दडपशाहीला आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. आंदोलकांच्या या आक्रसताळेपणामुळे आमचा समाजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक,मागासवर्गीय व ओबीसींना त्यांनी वेठीस धरले आहे. गांवकूस, खेड्यातील वरील बांधव आजमितीस बिल्कूल सुरक्षित नसल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अल्पसंख्यांक,मागास समाजाला व ओबीसींना योग्यती सुरक्षा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आदेश द्यावेत तसेच हे जर असेच चालू राहिले व सरकार तर्फे जर या गोष्टींना आळा घातला गेला ना,ही तर कृपया आपण महाराष्ट्रामध्ये “राष्ट्रपती राजवट” लागू करावी, अन्यथा आम्हाला आमच्या आरक्षणासाठी व स्वसंरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरावे लागेल व त्यास हे महाराष्ट्र शासनच जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा शहर जिल्हा अध्यक्ष अनिल धोंङीबा राऊत, खानदेश तेली समाज अध्यक्ष अनिल जयराम चौधरी, शैला चौधरी, सुनंदा चौधरी, भरत चौधरी, रमेश चौधरी व समाज बांधव उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.