Pimpri Chinchwad : गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट 2 च्या पथकाने(Pimpri Chinchwad ) एका 19 वर्षीय तरुणाला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसा सह अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.3) चिखलीतील महादेवनगर येथे दुपारी केली आहे.

जिशान शब्बीर खाल (वय 19 रा.चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार जमीर तांबोळी यांनी फिर्याद दिली आहे.

Pimpri : आमदारांचे कार्यालय तोडफोड आणि घराला आग लावल्याच्या निषेधार्थ राज्यपालांना निवेदन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तापला रचून (Pimpri Chinchwad )आरोपीला चिखली येथील महादेवनगर परिसरातील समाज मंदिरा समोरून ताब्य़ात घेतले. यावेळी त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस अशी एकूण 26 हजार रुपयांची शस्त्रे जप्त केली. आरोपीवर चिखली पोलीस ठाण्यात आर्म अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.