Kalewadi News: काळेवाडी येथे एका श्वानाचे तोंड प्लास्टिक बरणीत अडकले

एमपीसी न्यूज : काळेवाडी येथे एका श्वानाचे तोंड प्लास्टिक बरणीत अडकले पण ती पळूण गेल्याने काढण्यात अपयश आले आहे.(Kalewadi News) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना श्वानासंबंधी वर्दी देण्यात आली असून थेरगाव केंद्राला याबाबत कळवण्यात आले. तेथील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. त्या श्वानाचा शोध बराच वेळ घेतला मात्र ते मिळाले नाही.

या बाबत अधिक माहिती देताना प्राणी मित्र राकेश झोडगे म्हणाले की, “पिंपरी गाव – काळेवाडी पुलाजवळील काळेवाडी मध्ये असलेल्या एका बांधकाम साईट वरील बिल्डिंगच्या मधील प्लंबिंगच्या कामाचे कंत्राट मी घेतले आहे. त्यामुळे त्या साइटवर मी दररोज सकाळी गेली दोन ते तीन दिवस जात आहे.(Kalewadi News) मी दररोज येथे एक मादी श्वान व तिची पिल्ल पाहत आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे साइटवर 9 वा ते 9.30 वा चे दरम्यान गेले असता मला ती मादी श्वान दिसली. तिचे तोंड एका पारदर्शक प्लास्टिक बरणीत अडकले होते.”

Ganesh Utsav : गणेश उत्सवात यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा देखावा साकारावा – सुधीरकुमार अगरवाल

ते पुढे म्हणाले की, ” मी तीन-चार वेळेस तिच्या जवळ जाऊन तिच्या गळ्यातील बरणी काढण्यासाठी प्रयत्न केला. मी तिच्या जवळ जात असताना तिने पाहिले की लगेच ती परत पळून जात असे. असे तीन चार वेळेस घडले. त्यामुळे नंतर मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले.” पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी श्वानासंबंधी वर्दी थेरगाव केंद्राला कळवली होती. तेथील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.(Kalewadi News) त्यांनी त्या श्वानाचा शोध बराच वेळ घेतला पण ती काही सापडली नाही. झोडगे म्हणाले की, “ती मादी श्वान मी बांधकाम साईट वर संध्याकाळी 6.30 वा पर्यंत होतो. पण तॊ पर्यंत ती मादी श्वान परत आली नव्हती. उद्या सकाळी परत बांधकाम साइटवर गेल्यावर मी परत तिचा शोध घेईन.” आली नव्हती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.