Kamshet : पाथरगाव खिंडीत दोन कंटेनरची धडक होऊन महामार्गावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – कंटेनरला पाठीमागून भरधाव येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज सकाळी वाहतूक कोंडी झाली. कामशेतजवळ पाथरगाव खिंडीत हा अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) सकाळी साडेसातच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर पाथरगाव खिंडीच्या चढावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला मागून भरधाव येणाऱ्या कंटेनर ( क्र. एम एच 12 – एफ झेड 5148 ) ची धडक बसून अपघात झाला.

यात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील कंटेनरचालक अपघात झाल्यानंतर पळून गेला. अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या मधोमध असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

कामशेत पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हणमंत वाघमारे, गणेश गव्हाणे, कृष्णा बोंबले, अक्षय साबळे, विकास साळवे आदींनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करीत महामार्ग खुला केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.