Karnataka Election Result : कर्नाटक काँग्रेसच्या विजयात पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ महिला नेत्यांचा  वाटा..

एमपीसी न्यूज – कर्नाटक विधानसभा (Karnataka Election Result) निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. 130 जागांवर आघाडी घेत काँग्रेस बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसच्या या ऐतिहासिक विजयात पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस नेत्या निगार बारस्कर यांचाही मोठा वाटा आहे.  त्यांच्याकडे निरीक्षक म्हणून जबाबदारी असलेल्या उत्तर कनडा जिल्ह्यातील काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.

कर्नाटकच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष्य लागले होते. भाजप आणि काँग्रेसने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यात कर्नाटकच्या जनतेने भाजपला नाकारत काँग्रेसला कौल दिला आहे. काँग्रेसने प्रचाराचे अतिशय बारकाईने नियोजन केले होते. अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीने पिंपरी-चिंचवडमधील काँग्रेस नेत्या, माजी नगरसेविका निगार बारस्कर यांच्याकडे पाच विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर कनडाची जबाबदारी सोपविली होती. त्यांनी निरीक्षक म्हणून कामगिरी चोखपणे बजाविली.

कर्नाटक मधील काँग्रेसच्या विजयानंतर ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना निगार बारस्कर म्हणाल्या, प्रचारासाठी मी दीड महिने कर्नाटकमध्ये होते. माझ्याकडे जबाबदारी असलेल्या उत्तर कनडातील हल्याळमधून आर. व्ही.देशपांडे हे सात हजार मतांनी सलग नवव्या वेळेस जिंकले आहेत. तर, भटकळमधून मंकाळ वैद्य, सिरसीमधून श्रीमन्न नाईक, कारवारमधून सतीश सेल असे चार काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. सर्वधर्मीय मतदारांनी पूर्णपणे काँग्रेसला मतदान केले. प्रचाराचे नियोजन बारकाईने केले.

Pune : पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटकात झालेल्या काँग्रेसच्या विजयासाठी मारुती मंदिरात केली आरती

एक व्हॉटसप ग्रुप तयार केला होता. महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, बाकीच्या महिला घरोघरी केलेल्या प्रचाराची माहिती ग्रुपवर टाकत होत्या. मी स्वतः प्रत्येक महिला पदाधिकाऱ्यांना घेऊन प्रचार करत होते. महिला काँग्रेसची जिल्हाध्यक्ष सुजाता गावकर यांच्यासोबत मी सर्व विभागात प्रचार करत होते. अनेक सभा घेतल्या. माझ्याकडे जबाबदारी असलेल्या  मतदारसंघात प्रियांका गांधी, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के.शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या सभा झाल्या.

उत्तर कनडा जिल्ह्यातील लोक अतिशय गरीब आहेत. महागाईने मेटाकुटीला आले आहेत. महागाईची मोठी झळ बसली आहे. मच्छिमारांचेही नुकसान झाले आहे. आम्ही सत्तेत आलो तर गॅरंटी कार्ड दिले होते. आम्ही खोटे बोलत नाहीत. भाजपने खात्यात 15 लाख रुपये देण्याचे सांगितले. पण दिले नाहीत. मात्र  आम्ही फक्त 2 हजार रुपये खात्यात येतील असे लोकांना सांगितले. आम्ही खोटे बोलत नाही सरकार आल्यास वीज मोफत, दहा किलो तांदूळ ही आश्वासने 100 टक्के पूर्ण करणार याची ग्वाही दिली.

छत्तीसगडमध्ये हा उपक्रम राबवित असल्याचे लोकांना सांगितले. लोकांना आमच्यावर विश्वास होता हे प्रचारात दिसत होते. त्यामुळेच लोकांनी काँग्रेसला विजयी केले आहे. आता सरकारने जनतेची कामे करावीत. डी. के.शिवकुमार की  सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असेही त्या म्हणाल्या. उत्तर कनडा जिल्ह्याची आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही माझ्याकडेच निरीक्षक म्हणून जबाबदारी असल्याचेही (Karnataka Election Result) त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.