Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील आरोपी सापडले

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या (Talegaon)  हत्या प्रकरणातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

किशोर आवारे यांची शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी पळून गेले. आरोपींच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विविध पथके रवाना केली. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोन यांच्या पथकांनी नवलाख उंबरे येथून तिघांना ताब्यात घेतले. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे पर्यंत पोलिसांची शोधमोहीम सुरू होती.

Kishore Aware : कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन मारेकरी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले आहे. तर पुणे पोलिसांनी नाना उर्फ संदीप मोरे याला ताब्यात घेतले. नाना मोरे याला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील (Talegaon)तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.