Kishore Aware : कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

एमपीसी न्यूज – किशोर आवारे (Kishore Aware)  यांच्या निधनाने त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. शुक्रवारी रात्री किशोर आवारे यांचे पार्थिव स्मशानभूमीत आणले असता कार्यकर्त्यांनी ‘भाऊ…’ म्हणून हंबरडा फोडला. अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

किशोर आवारे यांची शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानापासून वैकुंठरथात अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या कुटुंबियांसह अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती की, त्यांची अंत्ययात्रा त्यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरापासून न्यावी. त्यामुळे आवारे यांच्या घरापासून सुरुवातीला विठ्ठल मंदिर आणि त्यानंतर इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव स्टेशन चौक मार्गे तळेगाव गावठाणातील बनेश्वर स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा निघाली.

Pune : बोगस बियाणे, खते, किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

स्मशानभूमीत पार्थिव आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भाऊ, आम्हाला उघड्यावर पाडून गेलात. असे म्हणत एका कार्यकर्त्याने हंबरडा फोडला. किशोर आवारे यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक माणसे जोडली होती. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेसाठी तळेगाव, मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे यासह आजूबाजूच्या (Kishore Aware) जिल्ह्यातून कार्यकर्ते आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.