Khadki : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज- खडकी परिसरात गांजा विक्रीसाठी (Khadki) आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 22 किलो गांजा, दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवीन उमाकांत पिल्ले (वय 34, रा. खडकी), जितेंद्र कुलदीपसिंग मुलगानी (वय 32, रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पिल्ले आणि मुलगानी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला.

Pune : चंदननगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेची कारवाई

पोलिसांना पाहताच पिल्ले आणि मुलगानी दुचाकीवरुन पसार झाले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत 22 किलो गांजा सापडला.

पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसाेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक अमर कदम,  उपनिरीक्षक वैभव मगदूम, उपनिरीक्षक भानुदास भालेराव,   तानाजी कांबळे, संदेश निकाळजे, जहांगिर पठाण, ऋषिकेश दिघे, शिवराज खेड  सागर जाधव आदींनी ही कारवाई (Khadki) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.