Pune : सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज- महापालिकेतील 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त (Pune) झालेल्या सेवक, प्राथमिक, माध्यमिक तसेच तांत्रिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार कार्यवाही करून फरकाची रक्कम मे अखेर तातडीने द्यावी, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

महापालिका सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत, सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष संभाजी भोसले यांच्यासह निवृत्त सेवक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षण विभागातील एकूण 2हजार 553 सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असून सन 2016 पूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी 1 हजार 943 आहेत. 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या महानगरपालिकेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत एकूण 350 सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विवरणपत्रे तयार केलेली आहेत. त्याअनुषंगाने तांत्रिक अडचणी, वेतन निश्चितीतील त्रुटी पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर सर्व अडचणी मेअखेरपर्यंत दूर करून निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Khadki : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

महापालिकेअंतर्गत सेवकांची एकूण 107 निवृत्तिवेतन प्रकरणे असून त्यातील त्रुटीची पूर्तता करून निवृत्तिवेतनधारकांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. आतापर्यंत 2016पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना 10 महिन्याचा फरक तसेच वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्याप्रमाणे 2016 पूर्वीच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व लाभ देण्यात आले आहेत, अशीही माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

 

सदरचे कामदेखील तातडीने पूर्ण करुन हे अखेरपर्यंत 7 वा वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच दोन महिन्यांनंतर सेवा उपदानाची रक्कम देखील अदा करावी, अशा सुचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी शिक्षण (Pune) अधिकाऱ्यांना दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.